Uncategorized

RSS प्रचारकावर हल्ला! 30 आरोपींवर गुन्हा दाखल

मुलताई शहरात गुरुवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक शिशुपाल यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिशुपाल यादव हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता जैन कोल्ड ड्रिंक जवळ त्यांच्या बाइकला दुसऱ्या युवकाने कट मारला. या घटनेवरून दोघांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता परिस्थिती चिघळली. वाद हातघाईवर आला आणि यादव यांना किरकोळ दुखापत झाली.
या घटनेनंतर दोन्ही समाजातील लोक आमनेसामने आल्याने शहरात तणाव वाढला. तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुलताई शहरात संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुस्लिम समाजातील तिघा तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कलेक्टर नरेंद्र सूर्यवंशी आणि एएसपी कमला जोशी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिक जमले असून आरोपींवर तत्काळ कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत सहभागी 30 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सध्या शहरात शुकशुकाट असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button