AmravatiLatest NewsMaharashtra

CITY NEWS IMPACT प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरटीओची कारवाई

अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईचा मोठा City News Impact! प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी स्पष्ट केलं आहे की — प्रवाशांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. काल अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने खास मोहिम राबवत खाजगी व बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली. अनेक खाजगी बसचालक व मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आमच्या प्रतिनिधीने आज प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, बसचालक व मालकांना नियमांची माहिती पूर्वीच देण्यात आली होती. तरीसुद्धा काहींनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. उर्मिला पवार यांनी स्पष्ट केलं की,
प्रवाशांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेबाबत विभाग सतत सतर्क आहे. खाजगी बसचालकांनी निश्चित नियमांचं पालन करावं, अन्यथा पुढील काळातही कडक कारवाई केली जाईल.
प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेला हा संदेश स्पष्ट आहे – नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील, आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी कुठलाही तडजोड होणार नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button