Uncategorized

लालखडी येथे गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडला

अमरावती – अमरावती शहरातील लालखडी परिसरात गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. सदर ट्रकमधून तब्बल 25 ते 30 गोवंश जनावरे वाहतूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही धाडसी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईदरम्यान ट्रकसह अंदाजे 18 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंश तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकचा क्रमांक आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई शहरातील गोवंश तस्करीवर मोठा आघात मानली जात आहे.
अमरावती शहर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. संपूर्ण घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे.
या कारवाईत सहभागी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास मोहीम राबवली. गोवंश तस्करीच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button