Uncategorized

मानसिक छळाला कंटाळून अनघाने घेतला बीपीच्या गोळ्यांचा हायडोस

अमरावती – स्वतःच्या वारसा हक्कासाठी लढत असलेल्या अनघा देवलासी यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. भूमी अभिलेख कार्यालय अमरावती आणि गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या वतीने झालेल्या मानसिक छळामुळे अनघा देवलासीने डिप्रेशनमध्ये येऊन बीपीच्या गोळ्यांचा हायडोस घेतला.
घटनेनंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना तातडीने अमरावती शहरातील एक्सान रुग्णालयात ऍडमिट करावे लागले. सध्या त्यांचे प्रकृती स्थिर असून, त्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत. या प्रकरणाची माहिती अनघा देवलासींच्या पती अमोल देवलासी यांनी सिटी न्यूजला दिली. त्यांनी सांगितले की, अनघा देवलासीला गेल्या काही दिवसांपासून सतत मानसिक त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे अशा परिस्थिती उद्भवली. पती अमोल देवलासी यांनी संबंधित प्रशासनाकडे न्याय मिळविण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button