Uncategorized

“महायुती सरकारच्या तेरवीचे जेवण! अमरावतीत शेतकऱ्यांचं १३ दिवसांचं आंदोलन संपन्न

अमरावती – अमरावती जिल्ह्यात गेल्या १३ दिवसांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन अखेर संपन्न झालं!
मात्र या आंदोलनाचा समारोपही अनोख्या पद्धतीने – म्हणजेच “महायुती सरकारच्या तेरवीच्या जेवणाने” करण्यात आला.
डॉ. अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड फोरमने सरकारच्या भेदभावपूर्ण मदतीचा निषेध करत आज आंदोलनाची सांगता केली.
शेतकऱ्यांसाठी सरसकट ५० हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाई आणि संपूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.
आंदोलकांनी सांगितलं — “अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या, तरीही सरकारकडून भरीव मदत मिळाली नाही!”
आता मागणी आहे — आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी ५ हजार कोटींचं विशेष पॅकेज आणि संपूर्ण कर्जमाफी!
आंदोलनाला प्रहार पक्ष, क्रांतीकारी स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि अनेक सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळाला.
किरण गुडधे, कपिल पडघान, संजय गडलिंग, मेजर हिदायत खान, मिर्झा अन्सार बेग आणि अन्य कार्यकर्त्यांनी या १३ दिवसांच्या आंदोलनात अथक परिश्रम घेतले.
डॉ. अलीम पटेल यांनी इशारा दिला — “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहील!”
महायुती सरकारच्या तेरवीच्या जेवणाने संपलेलं हे आंदोलन — शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला नवा आयाम देऊन गेलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button