तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याला निषेध

अमरावती – अमरावती जिल्हा, तिवसा तालुक्यातील पिक विमा धोरणातील गैरव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे जीवन बिकट बनले आहे.
गावातील शेतकरी यांनी 22 जून 2025 रोजी सोयाबीन पेरणी केली होती. मात्र, अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाचा नुस्कान झाला. या नुकसानाची तातडीने नोंद घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा हेल्पलाईन 14447 वर 28 सप्टेंबर 2025 रोजी माहिती दिली. तरीही, शासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही योग्य कारवाई झाली नाही. शेतकऱ्यांनी वारंवार विचारणा केली असता, ‘उडवा-उडवी’ अशी प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जाते. तसेच, कृषी अधिकारी, तिवसा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून देखील कोणतीही मदत मिळाली नाही. हीच स्थिती संपूर्ण तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. शासनाने वेळेत दखल न घेतल्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या शेतात घुरे-ढोरे सोडून निषेध व्यक्त केला. शेतकरी बांधवांचा हा निषेध हा त्यांच्या पिकासोबत जोडलेल्या मेहनतीवर केलेल्या अन्यायाविरुद्ध आहे. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.



