Uncategorized

ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी विरोधी कारवाई

नागपूर शहर गुन्हे शाखेने ऑपरेशन शक्ती अंतर्गत पिटा ॲक्ट अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पोलीस ठाणे पारडी क्षेत्रातशेरे पंजाब रेस्टॉरंट आणि लॉजिंग येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत चार आरोपी पकडले गेले आहेत – समीक्षा संजय शेंडे, मनजित अजितसिंग भाटिया, सुरेदरसिंग जसवंतसिंग भाटिया आणि शैलेंद्र गोविंदसिंग शेंगर. पोलीसांच्या तपासात समोर आले की, आरोपींनी पीडित महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे प्रलोभन देऊन देहव्यापार करण्यास भाग पाडले. यातील महिलांची सुटका करून सुरक्षिततेसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या कारवाईत ४ मोबाईल, २,५०० रुपये, २२,५१५ रुपये रोख, एक डीव्हीआर, ८५ नग विविध कंपनीचे कॉन्डोम, एक रजिस्टर आणि एक कॉन्डोम जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत ६६,३१० रुपये आहे. संबंधित आरोपी व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे पारडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहरांच्या निर्देशानुसार ही कारवाई मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणाविरुद्ध करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button