Uncategorized

अम. मनपाची रहिवासी वस्तीत अतिक्रमण हटवण्याची मोहीम

अमरावतीत अतिक्रमणविरोधी मोहीमे अंतर्गत मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी रहिवासी वस्तीतील गल्लीबोळा आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बडनेरा प्रभाग क्रमांक ४ मधील कुंभारवाडा, जनता कॉलनी, नवदुर्गा विहार आणि गोपाल नगर या भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाची तक्रार मनपाला केली होती. अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतूक आणि रहदारीला गंभीर अडचण निर्माण होत होती.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख श्याम चौरे यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. अमरावती अतिक्रमण पथकाने राजापेठ पोलिसांच्या सहकार्याने रस्त्यावर टाकलेल्या शेड, नालीवरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनेक नागरिकांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि अतिक्रमण विभागाचे आभार मानले आहेत. अतिक्रमण हटविण्याच्या या मोहिमेमुळे नगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास वाढला आहे. मनपा आयुक्तांनी फुटपाथ अतिक्रमण मोहीमे नंतर, आता गल्लीबोळांवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना सुरक्षित आणि मोकळ्या रस्त्याचा आनंद दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button