Latest NewsMaharashtra

मुख्याध्यापक ग्रामसभेचे सचिव नकोत – बुधोडा ग्रामस्थांचा आवाज

अमरावती – बुधोडा ग्रामसभेत ग्रामस्थांनी स्पष्ट मत व्यक्त केले की, जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिव म्हणून ग्रामसभेत उपस्थित राहिल्याने शाळेच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच गावातील नागरिकांनी याबाबत एकत्र येऊन निवेदन दिले आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, मुख्याध्यापकांना गावाच्या महसूल, ग्रामपंचायत आणि विकासकामांचा पुरेसा अनुभव नसल्याने, ग्रामसभेत योग्य निर्णय होत नाहीत. ग्रामस्थांनी हेही नमूद केले की प्रत्येक ग्रामसभेत नियुक्त ग्रामसेवक अनुपस्थित असतो. त्यामुळे गावातील प्रश्न मागे पडत आहेत. शाळेचे शैक्षणिक काम प्राधान्याचे असून, त्यावर लक्ष केंद्रित राहावे, म्हणून मुख्याध्यापकांना सचिवपदाची जबाबदारी देणे योग्य नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनास साकडे घालत, गावासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमावा, अशी मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button