AmravatiEducation NewsLatest News

गो. से. महाविद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर भव्य सौंदर्यकरणाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

खामगाव –  स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंत खामगाव शहराचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष, माजी खासदार खामगाव, माजी अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव, खामगाव रत्न स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जयंती सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने महाविद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर भव्य सौंदर्यकरणासाठी नगरपरिषद खामगाव व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वीस फूट उंचीच्या भव्य स्तंभ उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्तंभावर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा, महाविद्यालयाचे चिन्ह तसेच स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडेयांचे छायाचित्र लावण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन मा. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. प्रशांत शेळके (मुख्याधिकारी न. प. खामगाव), उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, मा. प्रकाश तांबट (उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. डॉ. प्रशांत बोबडे (सचिव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. अजिंक्य बोबडे (कोषाध्यक्ष,विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), प्रा. डॉ. नंदकिशोर महल्ले, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सप्ताह समन्वयक प्रा. डॉ. डी. एन. व्यास, प्रा. डॉ. हनुमंत भोसले, प्रा. डॉ. एस. टी. वराळे, प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, श्री. अनिल पाटील, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button