ओ.बी.सी. व बहुजना समाजाचा आमदार म्हणुन मी सदैव धनगर समाजाच्या पाठीशी – आ. रवि राणा

अमरावती – आ. रवि राणा यांना धनगर समाजाचे एस.टी प्रवर्गात आरक्षण करण्याबाबत सकल धनगर समाज अमरावती जिल्हाच्या वतीने मोर्चा काढुन धनगर समाजाने दिले निवेदन. ओ.बी.सी. व बहुजना समाजाचा आमदार म्हणुन मी सदैव धनगर समाजाच्या पाठीशी – धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सभागृहामध्ये रेटुन धरणार – आ.रवि राणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्व बहुजन समाजाचे मुख्यमंत्री असुन ओ.बी.सी. समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाप्रमाणेच संविधानाच्या चौकटीत राहुन धनगर समाजाला सुद्धा नक्कीच न्याय देणार – आ.रवि राणा
गंगा सावित्री निवासस्थानी मोर्चा घेवून आलेल्या धनगर समाजाच्या समाजबांधसाठी जेवणाची व्यवस्था करुन स्वत: मोर्चेकरी धनगर समाज बांधवांसोबत केले जेवण
धनगर समाज हा गेल्या अनेक वर्षांपासुन एस.टी प्रवर्गामध्ये घटनात्मक दृष्टया समाविष्ट असुन सुद्धा आतापर्यंत याबाबत शासनाद्वारे कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने व धनगर समाजाला तात्काळ एस.टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिले जावे याकरिता संपुर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चा द्वारे शासनाचे लक्ष वेधुन घेतल्या जात आहे. त्याअनुषंगाने सकल धनगर समाज अमरावती जिल्ह्याच्या वतीने आ.रवि राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी मोर्चा काढुन आ.रवि राणा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आ.रवि राणा यांनी सांगितले की, मी स्वत: ओ.बी.सी. व बहुजन समाजाचा आमदार असुन सदैव धनगर समाजाच्या पाठीशी राहुन धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सभागृहामध्ये रेटुन धरुन धनगर समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सर्व बहुजन समाजाचे मुख्यमंत्री असुन मराठा समाजाप्रमाणेच संविधानाच्या चौकटीत राहुन धनगर समाजाला सुद्धा नक्कीच न्याय देणार असल्याचे आ.रवि राणा यांनी सांगितले. तसेच शेकडोच्या संख्येने गंगा सावित्री निवासस्थानी मोर्चा घेवून आलेल्या धनगर समाजासाठी आ.रवि राणा यांच्यातर्फे सर्व मोर्चेकरांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. व स्वत: सुद्धा आ.रवि राणा यांनी मोर्चातील धनगर समाज बांधवासोबत जेवण केले. यावेळी धनगर समाजाचे नेते दिलीप येडतकर, आशिष माहोरे, माधव अवघड, अर्चना तालन, प्रदिप अलोने, मिलींद अवघड, प्रेमा लव्हाळे, डॉ.पाथुरडे, साधना मस्के, कल्पना ढोके, नंदा चाफले, मस्के साहेब, ज्ञानेश्वरराव ढोमणे, अरुण बांबल, बाळासाहेब अलोने, रोकडे साहेब, वांगे साहेब, पंकज गोहत्रे, तालन साहेब व असंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.



