AmravatiFestival NewsLatest News

नवदुर्गोत्सवाच्या पावन पर्वावर भाजपा नेत्या व स्टार प्रचारक मा.खा. सौ. नवनित राणा यांची शहर व ग्रामीण भागातील मंडळाला सदिच्छा भेट

भाजपा नेत्या व स्टार प्रचारक मा.खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी नवदुर्गोत्सवाच्या पावन पर्वावर शहर व ग्रामीण भागातील मंडळाला दिल्या सदिच्छा भेटी देऊन केली महाआरती, महाआरतीव्दारे शेतकऱ्यांचे दुख दुर होऊन त्यांचा जिवनात सुख-समृध्दी येण्याकरीत केली प्रार्थना, पावसाच्या कहरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकार व राज्य सरकार विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस सोबत असून शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त मदत देण्याचा राज्य सरकारचा शब्द – सौ.नवनित रवि राणा आर्वि येथील आ.सुमीत वानखडे यांच्या रासगरब्यामध्ये मा.खा.सौ.नवनित रवि राणा यांची विशेष उपस्थिती..

संपूर्ण अमरावती जिल्हयासह विदर्भामध्ये महादुर्गेचे आगमन झाले असून विविध मंडळाव्दारे दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. व रासगरब्याचे सुध्दा आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भाजपा नेत्या व स्टार प्रचारक माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी शहर व ग्रामीण भागातील मंडळाना सदिच्छा भेटी देवुन मंडळामध्ये महाआरती केली. तसेच महाआरतीव्दारे शेतकऱ्यांचा दुख दुर होवुन त्यांचा जिवनात सुख समृध्दी यावी याकरीता प्रार्थना सुध्दा केली.
त्याचप्रमाणे पावसाच्या कहरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकार व राज्य सरकार विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस पाठीशी असून शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना देणार असल्याचा शब्द सुध्दा राज्य सरकारव्दारे देण्यात आल्याचे सांगीतले.
यावेळी आर्वि मतदार संघाचे आमदार सुमित वानखडे व्दारा आयोजित रासगरब्यामध्ये माजी खासदार सौ.नवनित राणा यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शविली.
तसेच कुऱ्हा, अमरावती शहरातील जलाराम नगर बाप्पा गोपाल शारदा मंडळ, जुनी अमरावती अंबा गेटच्या आतील दत्त मंदिर कुंभारवाडामंडळ, माळीपुरा नवदुर्गोत्सव मंडळ, एकविरा देवी मंदिर खरकाडीपुरा, तारखेडा परीसर शारदा उत्सव, जयअंबे मंडळ, महात्मा फुले मंडळ, तसेच प्रभात मंडळ, सराफा मंडळ, महाराणा प्रताप चौक,सराफा बाजार मंडळ, कालाराम मंडळ, जवाहर गेट सह लोहाना महाजनवाडी बुटी प्लॉट इतर ग्रामीण भागातील मंडळाला सुध्दा त्यांनी सदिच्छा भेटी दिल्या आहे.
यावेळी सुनिल खराटे, गंगा खारकर, माजी नगरसेविका संगीता बुरंगे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विक्की शर्मा, चंद्रशेखर जावरे, अविनाश देऊळकर, अशोक पांडे, अविनाश चुटके, प्रविण हरमकर, सिमेष श्रॉफ, अनिल पवार, संजय तिरथकर, आकाश पाटील, हरीष साऊरकर, गणेशदास गायकवाड, प्रविण मोखडे, राजेश अंबाडकर, लिना जावरे, संजय मुनोत, आकाश राजगुरे, वैभव बेलसरे, साखरकर काका, उमेश कांडलकर, वैभव बेलसरे, सुभाष खोरगडे, विक्की बिसने, निलीमा गुल्हाने, शुंभागी गुल्हाने, आकाश आजनकर, शिवानी राजगुरे, श्रध्दा बिसने, गिरधारी तिवारी यांच्या सह अनेक नागरीक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button