विद्यापीठातील गृह विज्ञान विभागात मायक्रोग्रीन्सवर कार्यशाळा उत्साहात

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील गृहविज्ञान विभागाच्यावतीने आयोजित टिचिंग रिसर्च डेव्हलपमेंट एक्सटेंशन अॅक्टीव्हीटी अंतर्गत “मायक्रोग्रीन्स” या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.क कार्यशाळेचे उद्घाटन नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय, रिसोर्स पर्सन म्हणून डॉ. सुचिता खोडके उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथी तथा उद्घाटक डॉ. अजय लाड मार्गदर्शन करतांना म्हणाले, मायक्रोग्रीन्स म्हणजे अन्नातील पोषणमूल्यांचा उत्तम स्त्रोत असून दैनंदिन आहारात समावेश केल्याने आरोग्य चांगले राहते. विद्याथ्र्यांनी कौशल्ये, कल्पकता,धाडस दाखवून नवीन स्टार्टअप्स उभारून स्वतःचा उद्योग उभारावा आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या.
रिसोर्स पर्सन डॉ. सुचिता खोडके यांनी मायक्रोग्रीन्सचे पोषणमूल्य, विविध प्रकार, त्यांचे औषधी गुणधर्म तसेच आहारात समावेश करण्याचे फायदे सांगून सहजपणे उपलब्ध होणा-या बिया वापरून मायक्रोग्रीन्स कसे तयार करावे याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे बी पेरणी, संवर्धन व कापणीची पध्दत विद्याथ्र्यांना समजावून सांगितली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वैशाली धनविजय म्हणाल्या, मायक्रोग्रीन्सचे आजच्या जीवनशैलीत अतिशय महत्त्व असून, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पोषक आहार आणि मायक्रोग्रीन्स ही त्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे सांगितले. कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख यांनीही याप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्याथ्र्यांच्या शंकांचे मान्यवरांनी निरसन केले. सूत्रसंचालन अनुश्री आडे, तर आभार सुमेध वडुरकर यांनी मानले. कार्यशाळेला विभागातील शिक्षक सुमित गेडाम, दिपाली भैसे, शिल्पा इंगोले, आयतल कामदार, शिक्षकेतर कर्मचारी अशोक हिरे, वसंत इंगळे तसेच विविध विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.



