विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-यायुवा महोत्सव प्रवेश अर्ज व योजनांची आवेदनपत्र भरण्यास 24 सप्टें.पर्यंत मुदतवाढ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवासाठी प्रवेश अर्ज तसेच विविध योजनांची आवेदनपत्रे भरण्यास कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी मुदतवाढ दिली आहे. विद्याथ्र्यांनी दिलेल्या मुदतीत आपले आवेदनपत्रे विद्यार्थी विकास विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता आवेदनपत्रे तसेच संत गाडगे बाबा कमवा व शिका योजना, विद्यार्थीनी बस पास सवलत योजना, शुध्द पेयजल योजना, आणि संत गाडगे बाबा शिक्षण संरक्षण योजनांची आवेदनपत्रे सादर करण्यास यापूर्वी 11 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु काही महाविद्यालयांच्या मागणीनुसार सदर योजनांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, ती आता 24 सप्टेंबर, 2025 पर्यंत करण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी, पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, विभागाचे प्रशासकीय केंद्र यांना पत्राव्दारे कळविण्यात आले असून, सर्वसंबंधितांनी याबाबत विद्याथ्र्यांना सूचित करावे. अधिक माहितीकरिता विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांचेशी 8855083964 यावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



