AmravatiMaharashtra
लालपरी रस्त्यातच थबकली! अमरावती-परतवाडा प्रवाशांचे हाल

आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास अमरावती बस आगारातून एमएच 13 सीयू 7370 ही बस परतवाड्यासाठी रवाना झाली. प्रवाशांनी भरलेली ही बस आसेगावाच्या अलीकडे अचानक बंद पडली. बसमध्ये बहुतांश प्रवासी हे परतवाडा आणि अचलपूर तालुक्यात सरकारी नोकरी करणारे होते, तर काही विद्यार्थीही आपापल्या कामासाठी निघाले होते. बस अचानक बंद पडल्याने सर्वांचेच वेळापत्रक बिघडले आणि ऐन उन्हात त्यांचे हाल झाले.
बस बंद पडल्यामुळे कंडक्टरने तात्काळ प्रवाशांचे अर्धे तिकीट कापून पैसे परत केले, पण यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि रोष दिसून आला. बऱ्याच प्रवाशांना तातडीने दुसऱ्या वाहनाची सोय करावी लागली, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त खर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागला.



