Latest News

अनिलभाऊ पेंढारी यांचा वाढदिवस अभिनंदन पेंढारी मित्र मंडळाचे वतीने कौटुबिक वातावरणात संपन्न 

छाबडा प्लॉट येथील रहीवासी तथा जैन समाजातील जेष्ठ समाजसेवक राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व लेखक, कवी अभिनंदन पेंढारी यांचे मोठे बंधु श्री अनिलकुमार उर्फ राजाभाऊ पेंढारी यांचा 76 वा वाढदिवस अभिनंदन पेंढारी मित्रमंडळा तर्फे त्यांचे निवासस्थानी उपस्थित चाह त्यांच्या वतीने उत्साहाने कौटुबिक वातावरणात करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणातुन अभिनंदन पेंढारी यांनी आपले मोठे बंधु राजाभाऊ पेंढारी यांच्या 75 वर्ष वाटचालीचा आढावा घेत राजाभाऊ यांनी परीवारासाठी दिलेले योगदान व त्यांचा सामाजिक कार्यकर्तृत्वाचा परिचय सविस्तरपणे विषद करीत त्यांचे वाढदिवसा निमित्य अभिष्टचिंतन केले. यानंतर अभिनंदन पेंढारी तथा अतिथीनी सत्कारमुर्ती राजाभाऊ यांचा शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ, मोत्याची माला, मानपत्र देऊन यथोचित भावपुर्ण सत्कार केला. यावेळी दिपक हुंडीकर, प्रा.दिलीप देशमुख, सेवानिवृत्त चिफ इंजिनियर अनिल सुराणा, जगदीश सायसिकमल, रुपेश नगरनाईक, अजय गंधे, सौ अंजली पाठक यांनी आपल्या भाषणातुन सत्कारमुर्तीच्या कार्याचा गुणगौरव करीत कवी, लेखक, समाजसेवा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रश्नासंबधी मार्गदर्शन, धार्मिक कार्यातील सहभाग व सकारात्मक विचार या त्यांच्या सद्गुणांची विशेष उल्लेख करीत जन्मदिनाच्या शुभेच्छा देत भविष्यातही त्यांचे हातुन असेच कार्य घडत राहो यासाठी निरामय आरोग्य लाभावे अश्या भावना व्यक्त केल्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुंदडा यांनी आपल्या भाषणातुन राजाभाऊना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत परमेश्वराने मनुष्य जिवन ही दिलेली मोठी देणगी असुन व सतकर्माने आपले जिवन सुंदर बनवावे ही बाब लक्षात घेत राजाभाऊ आपले जिवन जगत आहेत व समाजात एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणुन ते ओळखले जातात त्यांच्या कार्यापासुन नवीन पिढीने प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले. श्री राजाभाऊ यांनी सत्काराप्रति आभार व्यक्त करीत मातापित्यांचे सुसंस्कार व जैन धर्माची शिकवण सदैव लक्षात घेऊन माझी वाटचाल सुरु आहे व यापुढेही आपल्या सहकार्यानेच माझी समाजसेवा निरंतर करीत राहील असे सांगितले कार्यक्रमाचे संचालन अभिनंदन पेंढारी तर आभार प्रदर्शन शितल सिघवी यांनी केले. यावेळी प्रा राधेश्याम यादव, विजय बर्वे, सतीश देवरे, प्रदीप सागळे, अरुण बनारसे, मनिष पावडे, मीनाताई भेलांडे, माधुरी पेंढारी, सौ अनिला, आशाली, अनित, आयुषी पेंढारी परीवार उपस्थित होते. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button