भारत विकास परिषद खामगाव तर्फे आयोजित राष्ट्रीय समूह गान स्पर्धा- २०२५ या स्पर्धेत गो. से. कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने पटकविला तृतीय क्रमांक

खामगाव (प्रतिनिधी) स्थानिक सरस्वती विद्यालय खामगाव येथे भारत विकास परिषद तर्फे आयोजित राष्ट्रीय समूह समूह गान स्पर्धेत गो.से. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेमध्ये खामगावातील 12 शाळांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये नेहा वारभुवन,अपूर्वा बोदडे,नंदिनी चव्हाण वर्ग बारावी कला, प्राची वानखडे, रोशन सावळे, यश सुरडकर वर्ग बारावी विज्ञान, देवेश अंबुस्कर वर्ग अकरावी विज्ञान यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. तसेच मोहित गलवाडे वर्ग बारावी विज्ञान याने तबल्यावर व गणेश बावस्कर याने हार्मोनियम वर विद्यार्थ्यांना साथ दिली. सदर विद्यार्थ्यांचे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉ.सुभाषजी बोबडे, उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट,सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर व उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे, विभाग प्रमुख प्रा. एस डी वाघ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा.पी.डी कायपेल्लीवार व डॉ.अर्चना कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले. या यशामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्रा. अशोक ढाले, प्रा. योगेश टापरे प्रा.धर्मराज मोगल प्रा.पल्लवी खरात, प्रा. श्वेता कदम प्रा. आदर्श जगताप, प्रा. धीरज मोहिते प्रा. सोनाली कोल्हे, प्रा. उमेश खंदारे, प्रा. अरविंद गोमासे, प्रा. गौरी पाटील, प्रा.डॉ.अनिता कामठेकर, प्रा. विनोद डाबरे, प्रा. मधुरा शिंगाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अभय मोहिते यांचे देखील सहकार्य लाभले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



