Uncategorized

विद्यापीठात ‘फिजिक्स क्लब 2025-26’ कार्यक्रमाचे 18 सप्टेंबर रोजी आयोजन

भौतिकशास्त्र विभागाचा उपक्रम

                 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने दि. 18 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता ‘फिजिक्स क्लब 2025-26’ कार्यक्रमाचे आयोजन भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात करण्यात आले आहे.  उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून वरीष्ठ प्राध्यापक तथा भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. श्रीनिवास ओमनवार यांचे शुभहस्ते उद्घाटन संपन्न होईल.  कार्यक्रमाला रिसोर्स पर्सन म्हणून वरीष्ठ प्राध्यापक तथा इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

                 दुपारी 1 वाजता प्रश्नमंजुषा होणार असून त्यानंतर लगेचच मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल.  तरी भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित ‘फिजिक्स क्लब 2025-26’ कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे व फिजिक्स क्लब 2025-26 चे अध्यक्ष श्री आदित्य प्रधान यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button