Uncategorized
विद्यापीठात केशव सिताराम ठाकरे यांची जयंती साजरी

अमरावती – (दि. 17/09/2025)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन व प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.



