मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी समुपदेशन हा एकमेव पर्याय – डॉ. सिंकदर अडवाणी

मानवी मेंदुची रचना आणि कार्यप्रणाली ही अद्वितीय असून ती समजून घेणे फार गरजेचे आहे. तणाव, नैराश्य व मानसिक आजार यांचा मेंदुवर होणारा प्रभाव समजून घेतल्यास उपचार करणे सोयीचे होते. मेंदूमध्ये स्वत:ला दुरूस्त व बरे करण्याची क्षमता असून त्याचा उपयोग मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी होवू शकतो. लाईफ लाँग लर्निंग मेंदुला सक्रिय ठेवते व व्यक्तिमत्व विकासाला चालना देत असल्याचे प्रतिपादन अमरावतीचे सुप्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. सिकंदर अडवाणी यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील एम.ए. समुपदेशन व मानसोपचार या अभ्याक्रमाच्यावतीने प्रवेशित झालेल्या विद्याथ्र्यांसाठी ‘इन्डक्शन प्रोग्राम’ चे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
डॉ. सिकंदर अडवाणी पुढे म्हणाले, समाजामध्ये विविध सामाजिक, कौटंुबिक समस्यां निर्माण होतात. यामुळे कुटुंबात वाद होतात. समुपदेशन नसल्याने या समस्या गंभीर आजारामध्ये रुपांतरीत होतात. वेळीच जर त्यांना समुपदेशन मिळाले, तर त्यांच्या मेंदुचा उपचार करुन समस्या तात्काळ सुटु शकते. असे ते ‘द ब्रोन हीलींग अॅन्ड हयुमन पोटन्शियल ए न्यूरोलॉजिस्ट प्रस्प्रेक्टिव्ह फॉर लाइर्फ लाग्ँा लर्नर्स’ या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन बोलतांना म्हणाले.
अध्यक्षीय भाषणातून संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी विभागामध्ये सुरु असलेल्या एम.ए. समुपदेशन व मानसोपचार हा अभ्यासक्रम सुरु करण्यामागील भूमिका विषद केली. ते पुढे म्हणाले, समुपदेशनासाठी भारताला दहा कोटी समुपदेशकांची गरज आहे. कारण रोजचा तणाव, नैराश्य, मानसीक आजार व सद्या चर्चेत असलेले अंमली पदार्थ, यामुळे समाजात निर्माण होत असलेल्या सामाजिक व कौटुंबीक समस्यां सोडविण्याकरीता समुपदेशन हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्याथ्र्यांकरीता प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यापीठ गीताने करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय प्रा. शिवाणी अग्रवाल यांनी करुन दिला. संचालन राहुल कुकलकर यांनी, तर आभार समन्वयक प्रा. अर्चना ढोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. सुरेश राहटे, प्रा. विनय रत्नपारखी, प्रा. प्रगती तंबागडे, दिपक अडसड, विलास राऊत, विनीत बोकाडे, कु. वर्षा मानकर यांचे सहकार्य लाभले.



