Latest News

मोदींच्या जपान दौऱ्यानंतर महाराष्ट्रात बुलेट ट्रेनसाठी मोठा अपडेट

गुजरातमधील प्रगतीनंतर आता महाराष्ट्रातही बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोर पकडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यानंतर एनएचएसआरसीएलच्या हवाल्याने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या रेल्वे रुळांच्या कामासाठी मेसर्स लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) सोबत करार केला आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील 157 किमी लांबीच्या मार्गावर ट्रॅक डिझाइन, पुरवठा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वयन या सर्व कामांचे आयोजन एल अँड टीमार्फत करण्यात येणार आहे.

एल अँड टीसोबत सुमारे 4,400 कोटी रुपयांचा करार झाल्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशनपासून महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील जरौली गावापर्यंत ट्रॅक टाकण्यात येणार आहेत. यात चार स्थानके तसेच ठाण्यातील रोलिंग स्टॉक डेपो यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या 500 मीटर वायडक्टचे काम पूर्ण झाले असून, सुमारे 10 किमीपेक्षा जास्त मार्ग तयार होऊन ट्रॅकचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई-अहमदाबादमधील अंतर फक्त दोन तासांत पूर्ण करता येईल.

बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानातील ‘बॅलास्ट-लेस स्लॅब ट्रॅक सिस्टम’ वापरली जात आहे. हा ट्रॅक आरसी ट्रॅक बेड, सिमेंट डांबर मोर्टार, प्री-कास्ट ट्रॅक स्लॅब आणि रेल फास्टनर या चार भागांपासून बनलेला आहे. या तंत्रज्ञानामुळे गाड्यांचा वेग आणि सुरक्षितता दोन्ही अबाधित राहणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button