अमरावती– अकोला एसटी बस : एसीतून पाणी गळते, प्रवाशांचा संताप

अमरावती ते अकोला शिवशाही बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बसच्या स्थितीबाबत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बसच्या एसीतून थेट पाणी गळत असल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या बसेसवर मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे फोटो झळकवले जातात, पण प्रत्यक्षात बसची अवस्था निराशाजनक असल्याचे प्रवाशांनी सांगितले. प्रवाशांचे म्हणणे आहे की, कुठे गाड्या रस्त्यात बंद पडतात, कुठे तांत्रिक बिघाड होतो, तर कुठे एसीतून पाणी गळते.
“तिकिटाचे दर वाढले, पण सुविधा सुधारल्या नाहीत,” असा रोष प्रवाशांनी व्यक्त केला. सरकार, एसटी महामंडळ, डेपो मॅनेजर आणि लोकप्रतिनिधी यांना दोष कोणाचा, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एसटीचाच आधार घेऊन ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही समस्या गंभीर ठरली आहे. बाहेरून फोटोंचा दिखावा असला तरी प्रत्यक्षात प्रवाशांना त्रास होत असल्याची टीका आता जोर धरत आहे.



