Accident NewsLatest News

यवतमाळमध्ये ट्रकची धडक; ७० वर्षीय वृद्ध ठार, तिघे जखमी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात काल एक भीषण अपघात घडला. खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारवाडी फाटा परिसरात हा अपघात झाला. अनसिंगकडून पुसदच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही नागरिकांना तसेच एका दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात ७० वर्षीय श्रीराम राठोड, (रा. मारवाडी खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत आणखी तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन पुसद येथे करण्यात आले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ट्रक चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे ही दुर्घटना घडली. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button