Uncategorized

अमरावतीत गोवंश तस्करीचा मोठा पर्दाफाश, ५१ जनावरे वाचली, ट्रक जप्त

अमरावती शहरातील लालखडी येथे गुन्हे शाखेने गोवंश तस्करी करणारा एक ट्रक पकडला आहे. कत्तलीसाठी नेली जाणारी ५१ जनावरे पोलिसांनी वाचवली आहेत, तर ११ जनावरांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

अमरावती शहरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे. नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील लालखडी येथे गुन्हे शाखेने गोवंश तस्करी करणारा एक ट्रक पकडला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे ५१ गोवंशांचे प्राण वाचले आहेत, तर ११ मृत गोवंशही आढळले आहेत

ही घटना अमरावती शहराच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील लालखडी परिसरातील आहे. गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, एका ट्रकमधून अवैधरीत्या गोवंश कत्तलीसाठी नेले जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि लालखडी ते पन्नीपुरा जाणाऱ्या रोडवर MH 27 X 8886 या क्रमांकाचा एक ट्रक पकडला. पोलिसांची गाडी जवळ येताच ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. पोलिसांनी जेव्हा ट्रकची तपासणी केली, तेव्हा आतमध्ये गोवंश जातीचे एकूण ६२ जनावरे आढळली. त्यापैकी ५१ जनावरे जिवंत होती, तर ११ जनावरांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या ठिकाणी दोन पंच, पशुवैद्यकीय अधिकारी आणि गौरक्षण संस्थेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी ५१ जिवंत जनावरे आणि ट्रक असा एकूण २७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत आणि पळून गेलेल्या ट्रकचालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गोरक्षकांना दिलासा मिळाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button