संगीतसृष्टी हादरली! प्रसिद्ध गायिकेचं निधन, 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीतविश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय आणि लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या एका प्रसिद्ध गायिकेने या जगाचा निरोप घेतला आहे.
मुंबई : संगीतविश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय आणि लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या एका प्रसिद्ध गायिकेने या जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून ती एक गंभीर आजाराशी झुंज देत होती. अखेर 16 मे रोजी दुपारी तिची जीवनयात्रा संपली. अवघ्या 44 व्या वर्षी तिचा मृत्यू झाल्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही गायिका म्हणजे गायत्री हजारिका, जी आसाममधील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान गायिका म्हणून ओळखली जात होती. तिच्या सुरेल आवाजाने ती लोकांच्या मनात घर करून गेली होती. “झोरा पाते पाते फागुन नामे” आणि “रती रती मोर झून” ही तिची गाजलेली गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. पारंपरिक आसामी लोकसंगीताला तिने एक नवा रंग दिला होता. लाईव्ह परफॉर्मन्समधील तिच्या उर्जेची छाप कायम राहील.



