Latest NewsMaharashtra

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी विजय जैन यांची १ कोटींची देणगी फडणवीसांना मुंबईत धनादेश सुपूर्द

मुंबई : सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत उद्योजक विजय जैन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हा धनादेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईत पार पडलेल्या भेटीदरम्यान सुपूर्त करण्यात आला.

या भेटीदरम्यान विजय जैन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून समाजाच्या विविध गरजांमध्ये मदतीचा हात देण्याची भूमिका अधोरेखित केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उदार मदतीबद्दल विजय जैन यांचे मन:पूर्वक आभार मानले आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या उद्योजकांचे अभिनंदन केले.

सध्या राज्यात विविध संकटांवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी महत्वाची भूमिका बजावत असून, अशा निधीतून गरजूंच्या मदतीसाठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे विजय जैन यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹1,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button