Accident NewsCrime NewsLatest NewsNagpur

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट…?

नागपूर: नागपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एम्स (AIIMS) रुग्णालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. संकेत दाभाडे (वय अंदाजे २३) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने आपल्या खोलीतील बाथरूममध्ये शाल घेऊन गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत दाभाडे हा गेल्या दोन दिवसांपासून आपल्या खोलीत होता. तो बाहेर येत नव्हता किंवा त्याच्या खोलीतून कोणताही आवाज येत नव्हता. यामुळे त्याच्यासोबत राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वॉर्डनला दिली.


नेमकं काय घडलं?

वॉर्डनने तात्काळ संकेतच्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत पाहिल्यावर त्यांना बाथरूमचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी तो दरवाजाही तोडला. बाथरूममध्ये प्रवेश केल्यावर त्यांना धक्का बसला. संकेतने शालच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले.

वॉर्डनने या घटनेची माहिती सोनेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासानुसार, संकेतने हे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button