AmravatiCity CrimeCrime NewsLatest News

आशा तायडे हत्या प्रकरण: पतीनेच दिली सुपारी

अमरावतीमधील आशा तायडे हत्या प्रकरण: पोलिसांनी यशस्वीरित्या उलगडा केला आहे .

अमरावती: अमरावतीमधील आशा तायडे हत्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वीरित्या उलगडा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती राहुल तायडे यानेच आपल्या पत्नीच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुपारी घेणाऱ्या श्रेयश महाले आणि ओम शिकार यांना ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही वर्षांपासून राहुल आणि आशा यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. राहुलचे दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशाने त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या महिनाभरापासून तो या हत्येचे नियोजन करत होता. पत्नी आशा एका अपघातामुळे घरी नसताना, राहुलने या संधीचा फायदा घेत तिच्या हत्येचा कट पूर्णत्वास नेला.

पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली असून, लवकरच या गुन्ह्यातील इतर आरोपींनाही अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button