दस्तूरनगरमध्ये प्लास्टिकबंदी: महापालिकेकडून ३ हजारांचा दंड वसूल
अमरावती : अमरावती महानगरपालिका अंतर्गत झोन क्रमांक ३ दस्तूरनगर परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. आयुक्त सौम्या शर्मा चांडक आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
यशोदा नगर ते दस्तूरनगर चौक परिसरात पार पडलेल्या मोहिमेदरम्यान किरकोळ भाजीपाला व फळविक्रेत्यांकडून १ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच परिसरातील सर्व व्यावसायिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याच्या, स्वच्छता राखण्याच्या व ओला-सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी दोन डस्टबिन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्वच्छतेसंबंधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ आस्थापनांवर प्रत्येकी ₹१००० असा एकूण ₹३०००/- दंड वसूल करण्यात आला. मोहिमेदरम्यान जेष्ठ स्वच्छता निरीक्षक कुंदन हडाले व झोनचे स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.



