Latest NewsMaharashtra
मित्राने पैसे परत न दिल्याने थेट घराबाहेर लावला ‘उधारी फेड’ बॅनर

मैत्री हे आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि विश्वासाच्या नात्यांपैकी एक आहे, पण जेव्हा पैशांचा प्रश्न येतो, तेव्हा हेच नाते कसोटीला लागते. सध्या असेच एक उदाहरण समोर आले असून, kirankamlakartambe1968 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या जवळच्या मित्राला गरजेच्या वेळी पैसे दिले होते. मात्र, त्या मित्राने वेळेत किंवा दिलेल्या शब्दाप्रमाणे पैसे परत केले नाहीत. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने कंटाळून अखेर या व्यक्तीने एक टोकाचे पाऊल उचलले. त्याने थेट आपल्या मित्राच्या घराबाहेर “उधारी फेड” असा मोठा बॅनर लावला आहे.
हा बॅनर आणि त्यामागची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मैत्री आणि पैशांच्या व्यवहारातील विश्वासावर हा व्हिडिओ अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.



