Latest NewsNanded

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माहूरमध्ये रक्तदान संकल्प शिबिर: ५६ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माहूर : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, तालुका माहूरच्या वतीने मंगळवार, २२ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात एकूण ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा जाहिरात न करता, लोकोपयोगी उपक्रम राबवून साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, माहूर भाजपने रक्तदान शिबिरासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची निवड केली.

रक्तदान शिबिराचा शुभारंभ स्वच्छतादूत साईनाथ महाराज आणि श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय काण्णव यांच्या हस्ते श्री रेणुकामातेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, शहराध्यक्ष गोपू महामुने, तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अमित राठोड, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, कृष्णा जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचे आणखी एक आकर्षणाचे केंद्र ठरले ते म्हणजे पेंटर सुरेश आराध्ये यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या दालनात साकारलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आकर्षक रांगोळी. या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

रक्तदान शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल शहराध्यक्ष गोपू महामुने यांनी सर्वांचे आभार मानले. या शिबिरामुळे गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता होण्यास मदत होणार असून, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला जनतेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

प्रतिनिधी : गोपाल चव्हाण

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button