Latest NewsNanded

नांदेडमध्ये ठाकरे गटाचं हिंदी सक्तीविरोधात तीव्र आंदोलन

नांदेड : राज्य शासनाच्या पहिलीपासून हिंदी विषय सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात संतापाचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. शासकीय निर्णयाची प्रतिकात्मक होळी करत, घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठी भाषेचा अपमान होत असून, मराठी माणसाच्या अस्तित्वावर गदा येते, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडच्या प्रमुख चौकात एकत्र येत “हिंदी सक्ती हद्दपार”, “मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही” अशा जोरदार घोषणा दिल्या.

आंदोलकांचं म्हणणं:

“राज्य सरकारने मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा निर्णय घेतलाय. यामुळे मराठी भाषेचा विकास रोखला जाईल आणि विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येईल. आमचा हा लढा केवळ भाषेसाठी नाही, तर अस्मितेसाठी आहे.”

ठाकरे गटाचा इशारा:
आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे शिवसेनेकडून सरकारला इशारा देण्यात आला आहे की, “जर निर्णय मागे घेण्यात आला नाही, तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांमध्येही सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजीचं वातावरण आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button