Akola

गोवंश तस्करांवर अकोला पोलिसांचा प्रहार | २३ जनावरे वाचवले

अकोला : शुक्रवारच्या पहाटे अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीवर मोठा पोलिसी प्रहार करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत दोन पिकअप वाहनांमधून निर्दयतेने कोंबलेली २३ गोवंश जनावरे सुटका केली. ही धडक मोहीम पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनंतर पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात उभारण्यात आलेल्या दोन विशेष पथकांनी राबवली.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही वाहतूक नागपूरहून अकोल्याकडे सुरू होती. तस्करी करणारी टोळी समृद्धी महामार्गावरून जनावरे घेऊन येत होती आणि त्यांना एक मोटरसायकलस्वार व्यक्ती शहरात पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करत होता. या कारवाईत पोलिसांनी मोटरसायकलस्वारासह एकूण दोन आरोपींना अटक केली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत.

सदर जनावरे तात्काळ म्हैसपूर येथील आदर्श गौशाळेत हलवण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार आणि संगोपन सुरू करण्यात आले आहे.

  • कारवाईतील महत्त्वाचे मुद्दे:
    २३ गोवंश जनावरांची निर्दय कोंडी करून वाहतूक
  • २ पिकअप वाहनं आणि एक मोटरसायकल जप्त
  • २३,७५,००० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त
  • २ आरोपी अटकेत, २ फरार

आदर्श गौशाळेत जनावरांची देखभाल सुरू

ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कार्यवाहीमुळे जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि जिल्ह्यात गोवंश तस्करीविरोधात पोलिसांची कडक भूमिका अधोरेखित झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button