खेळाडूंनी वाढविला विद्यापीठाचा नावलौकिक – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

अमरावती – विद्यापीठाच्या खेळाडूंनी दक्षिण-पश्चिम विभाग व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन विद्यापीठाला विविध पदके व पारितोषिके प्राप्त करुन दिली आहेत. या सर्व खेळाडूंनी विद्यापीठाच्या विद्यापीठाचा नावलौकिक देशपातळीवर पोहचविला असून त्यात गौरवास्पद भर घातली आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने 2024-25 मधील दक्षिण-पश्चिम विभाग व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये प्राविण्यप्राप्त चमूतील खेळाडूंना रोख पुरस्कार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून तसेच चमू व्यवस्थापक आणि प्रशिक्षक यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ. सुभाष गावंडे, डॉ. विकास टोणे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. तनुजा राऊत उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, पदक मिळविणे सोपे नाही. पारंपारिक विद्यापीठांसह खाजगी विद्यापीठातील खेळाडू सुद्धा या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. खाजगी विद्यापीठे अद्ययावत सुविधा खेळाडूंना पुरवितात, त्या तुलनेत आपल्या खेळाडूंना कमी सुविधा असतात. तरी विद्यापीठाच्यावतीने खेळाडूंसाठी विविध सोयी-सवलतीमध्ये विद्यापीठाने वाढ केली आहे. रेल्वेतून ए.सी. कोचमध्ये प्रवासाची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली असून भत्त्यामध्ये सुद्धा वाढ केली आहे.
शारीरिक शिक्षकांची संख्या सेवानिवृत्तीमुळे कमी होत असली, तरी ज्या शिक्षकांकडे प्रभार दिल्या जातो, ते अधिक जबाबदारीने काम करतील. नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरीता सर्व समस्यां व अडचणींवर शिक्षकांनी मात करावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. ए.आय. चा सुद्धा क्रीडा क्षेत्रात वापर वाढवावा. आयोजित कार्यशाळेतून अद्ययावत ज्ञान व क्रीडा कौशल्ये शिक्षकांनी प्राप्त करुन आपल्या खेळाडूंपर्यंत पोहचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन विद्यापीठात सिन्थेटिक ट्रॅक व बहुउद्देशीय क्रीडा इमारत निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू पुढे म्हणाले, सर्व खेळाडू, चमू व्यवस्थापक व प्रशिक्षकांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळे अनेक पारितोषिके प्राप्त करुन विद्यापीठाच्या नावलौकिकात राष्ट्रीय स्तरावर भर घातली आहे. त्या सर्वांचे त्यांनी विद्यापीठाच्यावतीने अभिनंदन केले. भविष्यात आमचे खेळाडू आणखी पदके व पारितोषिके प्राप्त करतील, असा वि·ाास त्यांनी व्यक्त केला.
प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, देश पातळीवर दैदिप्यमान यश सर्व उत्कृष्ट खेळाडूंनी मिळविले आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून सर्व क्रीडा विषयावर तज्ज्ञ विचार मांडतील, त्यावर साधक-बाधक चर्चा होवून त्याचा उपयोग क्रीडा शिक्षणाचा विकास होण्याकरीता निश्चितच होईल. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये क्रीडा प्रशिक्षक व व्यवस्थापक अथक परिश्रम घेतात. कुलगुरू सुद्धा आपणा सर्वांच्या पाठीशी आहेत. अनेक सुविधा व संधी खेळाडूंना उपलब्ध करुन दिलेल्या आहेत, त्यामुळे भविष्यात आमचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाच्या नावलौकिकात आणखी भर घालतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यापीठ गीताने सुरु झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम व कार्यशाळा आयोजनामागील भूमिका क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी मांडली. संचालन डॉ. रुपाली टोणे व श्री संतोष वानखडे यांनी, तर आभार डॉ. चिंचमलातपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे तसेच शारीरिक शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, पाचही जिल्ह्रांतील क्रीडा संचालक, पालक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय, नांदगांव पेठचे डॉ. श्रीकांत माहुलकर व नाशिकचे डॉ. राजेश क्षत्रिय यांनी, दुसया सत्रात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या डॉ. कविता वाटाणे व यवतमाळचे डॉ. अनुप कोठारी, तिसया सत्रात सरस्वती कला महाविद्यालय, दहिहांडाचे डॉ. सागर नारखेडे व नागपूरच्या डॉ. माधवी मार्डीकर, तर चवथ्या सत्रात कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरबचे डॉ. अजय बोंडे व अमरावतीचे श्री आशिष देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रविण रघुवंशी उपस्थित होते.



