AmravatiLatest NewsLocal News

विचारशलाकाचे वैचारिक साहित्यामध्ये मौलिक योगदान – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

अमरावती : विचारशलाका या त्रैमासिकाचे महाराष्ट्रातील वैचारिक साहित्यामध्ये मौलिक योगदान असल्याचे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी डॉ. नागोराव कुंभार संपादित विचारशलाकाच्या महानुभाव तत्वज्ञान विशेषांकाचे विमोचन करतांना केले.  यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, संपादक डॉ. नागोराव कुंभार, अतिथी संपादक डॉ. संतोष ठाकरे, महानुभाव अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. महंत सोनपेठकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
                  कुलगुरू पुढे म्हणाले, विचारशलाका महानुभाव तत्वज्ञानावर आधारित अंकाचे विमोचन माझ्या हस्ते व्हावे, अशी अपेक्षा संपादक डॉ. कुंभार यांनी व्यक्त केली, त्यास मी होकार दिला.  आज मला खूप आनंद होत आहे की, माझ्या हस्ते या अंकाचे विमोचन याठिकाणी झालेले आहे.  मराठीतील पहिला ग्रंथ लीळाचरित्र हा अमरावती जिल्ह्रातील रिद्धपूर याठिकाणी लिहिल्या गेला.  आपल्या मातृभाषेतील पहिला ग्रंथ असल्याचा आम्हां सर्वांना अभिमान आहे.  समाज विकासासाठी श्री चक्रधर स्वामींनी दिलेले तत्वज्ञान खूप महत्वाचे असून त्याचा अभ्यास सर्वांनी करावा, असे सांगून संपादक डॉ. नागोराव कुंभार, अतिथी संपादक डॉ. संतोष ठाकरे व संपादक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.  डॉ. कुंभार यांच्या हातून असेच कार्य भविष्यातही घडत राहो, अशा शुभेच्छा सुद्धा कुलगुरूंनी याप्रसंगी दिल्यात.
                  विचारशलाकाच्या 500 पृष्ठाच्या या विशेषांकामध्ये 47 लेखांचा समावेश आहे.  यामध्ये महानुभाव तत्वज्ञानाच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकणाया डॉ. जनार्दन वाघमारे, यशवंत मनोहर, आ.ह. साळुंखे, इंद्रजित भालेराव, डॉ. संतोष ठाकरे, डॉ. श्रीधर आकाशकर, डॉ. युवराज शास्त्री, प्रा. दिपक तायडे, मा.रा. लामखडे, सतीश बडवे, नरेंद्र लांजेकर, रणधीर शिंदे आदी मान्यवर, विचारवंत, साहित्यीक आणि संशोधकांच्या लेखांचा समावेश आहे.  वाचकांना महानुभाव तत्वज्ञान समग्ररित्या समजून घेण्यासाठी या विशेषांकाचा निश्चितच लाभ होणार आहे.  विचारशलाकाने यापूर्वी चार्वाक तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान, महात्मा बसवे·ारांचे तत्वज्ञान असे महत्वपूर्ण विशेषांक काढून विचारवि·ा समृद्ध केले आहे.
                  याप्रसंगी डॉ. नागोराव कुंभार यांनी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.  अतिथी संपादक डॉ. संतोष ठाकरे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, लीळाचरित्रात समाज जीवन आहे, निसर्ग आहे, भौगोलिक वर्णन सुद्धा अतिशय सुंदर रितीने केले आहे.  800 वर्षांपूर्वी महिलांना सन्मान महानुभाव तत्वज्ञानामुळे मिळाला.  त्याकाळी महिलांना कुठलेच अधिकार नव्हते, ते अधिकार त्यावेळी महिलांना दिल्या गेले.  महिलांकडून दीक्षा सुद्धा दिल्या गेली.
                  प्रास्ताविक महानुभाव अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. महंत सोनपेठकर यांनी केले.  संचालन व आभार डॉ. संदीप जुनघरे यांनी मानले.  यावेळी डॉ. अण्णा वैद्य, डॉ. वानखेडे, डॉ. संदीप जुनघरे, प्रा. सिमा मेटकर, श्री अनंत तेलखडे, श्री गोवर्धन तेलखडे, सौ. प्रतिभा भूगूल, श्री सतिश मानकर, सौ. रजनी घोरमाडे, डॉ. मेहरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button