India NewsLatest News

Breaking News: सप्टेंबरआधीच होणार पालिकेच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे या प्रलंबित निवडणूका 4 महिन्याच्या आत होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला यासंदर्भात निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या, असे सुप्रिम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय. उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत.

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. 2022 पूर्वीच्या आरक्षणाबाबतचा कायदा लागू होईल. निवडणुका कालबद्ध पद्धतीने घ्याव्यात. मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जाणार असल्याने आवश्यकता भासल्यास मुदतवाढ मागता येईल, असेही निर्देशात म्हटलंय.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला ४ आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 2022 च्या अहवालापूर्वी राज्यात अस्तित्वात असलेल्या ओबीसी समुदायांना आरक्षण देण्यात यावे, असेही यात म्हटलंय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button