Uncategorized

विद्यापीठाला दिवाळीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी पर्यायी सुट्टी जाहीर


विद्यापीठ आणि संलग्रित महाविद्यालयांतील कर्मचा­यांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती – (दि. 24.10.2024)  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, विद्यापीठाला दिवाळीनिमित्त दि. 31 ऑक्टोबर, 2024 रोजी पर्यायी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  दि. 24 फेब्राुवारी, 2024 रोजी चाळीसावा दीक्षांत समारंभानिमित्त विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय विभाग सुरु ठेवण्यात आले होते, त्यानिमित्त पर्यायी रजा म्हणून विद्यापीठाने 31 ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त सुट्टी जाहीर केली आहे.  याशिवाय दि. 1 ते 3 नोव्हेंबर शासकीय सुट्ट¬ा आहेत.  

                 तसेच सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, विद्यापीठाचे कार्यालयीन कामकाज दि. 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत बंद राहील.  तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button