Social News
-
खामगाव :- गो. से. महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, प्रा. भुतेकर, प्रा. उमेश खंदारे, प्रा. अमित शिंदे व प्रा. डॉ. टकले उपस्थित होते. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या आत्मविश्वास, राष्ट्रनिष्ठा व चारित्र्यनिर्मितीच्या विचारांवर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम व दूरदृष्टीपूर्ण मातृत्वावर प्रकाश टाकला. “अपयश अंतिम नसते, जोपर्यंत प्रयत्न थांबत नाहीत,” असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. भुतेकर सर यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना आत्मबळ देतात, तर राजमाता जिजाऊंचे जीवन त्याग, संस्कार व राष्ट्रसेवेची प्रेरणा देते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ यांनी केली. यावेळी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला व निबंध स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. दादासाहेब बोबडे व सचिव सन्माननीय डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सोनल कळस्कर हिने केले तर कु. धनश्री हिने आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व एन. एस. एस. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.
Read More » -
विद्यापीठातील वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या विद्याथ्र्यांचा गौरव
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभाग’ आणि ‘एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन’…
Read More » -
राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेडमध्ये विद्यापीठाचे रासेयो स्वयंसेवक सहभागी होणार
अमरावती : 26 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे होणाया प्रजासत्ताक दिन परेडकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ…
Read More » -
विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती (युवक दिन) उत्साहात साजरी…
Read More » -
‘जागतिक पारायण दिन’ उत्साहात संपन्न; उषा कॉलनीतील गजानन महाराज सेवा मंडळाचा उपक्रम
अमरावती: संत गजानन महाराजांवरील अपार श्रद्धेला समर्पित ‘जागतिक पारायण दिन’ रविवारी, ११ जानेवारी २०२६ रोजी उषा कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज सेवा…
Read More » -
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्वामी विवेकानंद जयंती साजरी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्रात युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून मोठ¬ा उत्साहाने…
Read More » -
विद्याथ्र्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा – अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे
विद्यापीठात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन संपन्न अमरावती : महापुरुषांचे विचार नवीन पिढीला दिशादर्शक असतात. राजमाता जिजाऊ व स्वामी…
Read More » -
मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – डॉ. के.बी. नायक
विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांची मतिमंद मुलांच्या शाळेला शैक्षणिक भेट मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनासोबतच…
Read More » -
खामगावात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ पथनाट्यातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी जागर
गो. से. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समाजप्रबोधनात्मक उपक्रम खामगाव:- आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार, मानसिक व शारीरिक शोषण याविरोधात समाजात व्यापक…
Read More » -
जी. एस. कॉलेज, खामगावला ‘करिअर कट्टा’ अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्सचा मान; ए+ दर्जा प्राप्त
खामगाव : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या…
Read More »