India NewsInternational NewsLatest News
सौदी अरेबियात भारतीयाचा मृत्यू; १८ मार्चच्या घटनांशी संबंध असल्याची माहिती

रियाध येथे एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे… १८ मार्च रोजी घडलेल्या घटनांशी या मृत्यूचा संबंध असल्याचे भारतीय दूतावास यांनी सांगितले आहे…
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर हा मृत्यू झाला आहे… मात्र नेमकी परिस्थिती आणि मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही…
दूतावास सध्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून, स्थानिक प्रशासनाशीही समन्वय साधत आहे… या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे…
या घटनेमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे…
रियाधमधील या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात असून, पुढील तपासातून नेमकं काय घडलं हे स्पष्ट होणं महत्त्वाचं ठरणार आहे…



