वंदे भारत स्लीपर ट्रेनची धूम; फाइव्ह स्टारसारख्या सुविधा पाहून प्रवासी थक्क

भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेन हावडा ते गुवाहाटी (कामाख्या) दरम्यान सुरू झाली असून, तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे… या ट्रेनमधील सुविधा पाहून प्रवाशांचा अनुभव पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे…
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनमधील सुविधा ‘फाइव्ह स्टार हॉटेल’सारख्या असल्याचं दिसून येत आहे… कॅटरिंग सेवा आणि स्वच्छतेचा उच्च दर्जा पाहून अनेकांनी याची तुलना थेट फ्लाइटच्या बिझनेस क्लासशी केली आहे…
ट्रॅव्हल ब्लॉगर आदित्य यादव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वे स्टाफ अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने काम करताना दिसत आहे… अन्न सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्हज आणि हेअरनेटचा वापर केला आहे…
प्रवाशांना जेवण देण्यासाठी खास झाकलेल्या निळ्या ट्रॉलींचा वापर करण्यात येत असून, अन्न पूर्णपणे सीलबंद आणि सुरक्षित स्वरूपात दिलं जात आहे…
यापूर्वीच्या ट्रेनमध्ये जेवण सेवा अस्त-व्यस्त असल्याच्या तक्रारी येत असत, मात्र या नव्या पद्धतीमुळे प्रवाशांना अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित अनुभव मिळत आहे…
तसेच, एसी कोचमध्ये दिल्या जाणाऱ्या पारंपरिक पांढऱ्या चादरींऐवजी आता आकर्षक ब्लॉक-प्रिंट असलेल्या रंगीत बेडशीट्स देण्यात येत आहेत… यामुळे कोचला अधिक होमली आणि लक्झरी लुक मिळत आहे…
वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे भारतीय रेल्वे प्रवासाचा अनुभव आता अधिक आरामदायी, आधुनिक आणि आलिशान बनत असल्याचं स्पष्ट होत आहे… येत्या काळात अशा सुविधा इतर मार्गांवरही उपलब्ध होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…



