पुसदमध्ये स्वामी समर्थ प्रगट दिन उत्साहात साजरा; भक्तांची मोठी गर्दी

यवतमाळ जिल्हा मधील पुसद शहरात स्वामी समर्थ प्रगट दिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली… महाआरती आणि महाप्रसादामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता…
पुसद शहरातील गणेश पार्क, काकडदाती परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती… स्वामी समर्थांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता…
या निमित्ताने मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आरतीच्या वेळी वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते आणि भाविकांनी श्रद्धेने स्वामींची पूजा केली…
मंदिरात स्थापित करण्यात आलेली स्वामी समर्थांची आकर्षक आणि सुशोभित मूर्ती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती… अनेक भक्तांनी दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली…
तसेच, भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते… हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला…
शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने भक्तगण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते… त्यामुळे संपूर्ण गणेश पार्क परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते… या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वामी भक्तांनी अथक परिश्रम घेतले…
अशा प्रकारे पुसद येथे स्वामी समर्थ प्रगट दिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला…



