City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा प्रहार; ‘ऑपरेशन थंडर’ला मोठं यश

नागपूर शहरात गुन्हेगारांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट ५ च्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेला मोठं यश मिळालं असून, घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात आलं आहे…


नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ पथकाने पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत ही मोठी कारवाई केली आहे… पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दोन सराईत आरोपींना ताब्यात घेतलं…

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विनीत कैलास इंगळे (वय २१) आणि सुमित गणपत मेश्राम (वय १८) यांचा समावेश आहे… तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आलं आहे…

१५ मार्च २०२६ रोजी रात्री कोराडी परिसरातील दर्पण बार अँड रेस्टॉरंटचे शटर फोडून रोख रक्कम आणि विदेशी दारू चोरी करण्यात आली होती… या प्रकरणात आरोपींनी ४८ बाटल्या विदेशी दारू आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल लंपास केला होता…

वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपींकडून एक होंडा अॅक्टिव्हा आणि एक बजाज पल्सर २२० अशी दोन चोरीची वाहने जप्त केली आहेत… या कारवाईत तब्बल १ लाख ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे…

या प्रकरणातील आरोपी सुमित मेश्राम हा यापूर्वीच्या चार वाहन चोरी आणि मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये फरार होता… त्याला अटक करून एमआयडीसी, पाचपावली आणि जरीपटका पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत…

पोलीस तपासात समोर आलं आहे की ही टोळी नागपूर शहरातील विविध भागात यापूर्वीही अनेक घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होती… सध्या सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी कोराडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे…


एकीकडे नागपूर पोलिसांचे ‘ऑपरेशन थंडर’ यशस्वी होत असताना, दुसरीकडे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button