Accident NewsIndia NewsLatest NewsSocial News

तीन मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू; एकाच वेळी निघालेल्या अर्थ्यांनी गाव हादरलं

बेतिया जिल्ह्यातील एका भीषण रस्ता अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे… भरधाव बाईक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युरिया भरलेल्या ट्रकमध्ये घुसल्याने तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला…


ही घटना बैरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगही बढिया टोला परिसरात गुरुवारी उशिरा रात्री घडली…

मृतांची ओळख आलोक कुमार (वय २०), रोशन कुमार (वय १५) आणि विकास कुमार (वय २०) अशी झाली आहे… तिघेही मित्र गुरुवारी रात्री नाथबाबा चौक येथे आयोजित महायज्ञाचा मेळा पाहून परत येत होते…

रात्री सुमारे ११:४० वाजताच्या सुमारास तिघे एकाच बाईकवरून घरी परतत असताना अंधारामुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक त्यांना दिसला नाही… आणि बाईक थेट ट्रकच्या मागे जाऊन धडकली…

धडक इतकी भीषण होती की आलोक आणि विकास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला… तर रोशन याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला…

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले… ट्रक जप्त करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे…

शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले… एकाच वेळी तीन मित्रांच्या अर्थ्या निघाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली…

या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे… निष्काळजीपणा आणि अंधारामुळे घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावाला हादरवून सोडलं आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button