Accident NewscitynewsJalgaonLatest NewsMaharashtra

जळगावमध्ये भरधाव बसची बैलगाडीला धडक; शेतकरी गंभीर जखमी

जळगाव जिल्हा मधील जामनेर तालुक्यातील वाकोद येथे भरधाव खाजगी बसने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे… या अपघातात एक शेतकरी गंभीर जखमी झाला असून घटनास्थळी नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे…


वाकोद येथे आज दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला… पुणे येथून जळगावकडे जाणारी खाजगी बस रस्त्यावरून जात असलेल्या बैलगाडीवर आदळली…

धडक इतकी जोरदार होती की बैलगाडीचे मोठे नुकसान झाले… तसेच बैलगाडीवरील शेतकरी गंभीर जखमी झाला… अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली…

स्थानिकांनी तत्काळ जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत…

दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे… रस्त्यावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचं सांगितलं जात आहे…

अपघातानंतर बराच वेळ पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले नाहीत… यामुळे संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली… काही काळासाठी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते…

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे… तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे…


या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे… प्रशासन याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करणार का… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button