citynewsIndia NewsLatest Newspolitics

केरळमध्ये बदलासाठी जनता सज्ज; UDF च्या विजयाचा राहुल गांधींना विश्वास

राहुल गांधी यांनी केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडी म्हणजेच UDF च्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे… राज्यातील जनता बदलासाठी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं…


केरळ मध्ये राजकीय वातावरण तापलेलं असताना राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ‘X’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली…

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये “टीम UDF हीच टीम केरळम आहे” असं म्हणत आघाडीवर विश्वास व्यक्त केला…

राहुल गांधी म्हणाले की, UDF मधील प्रत्येक उमेदवार हा केरळच्या जनतेचा आवाज, त्यांच्या अपेक्षा आणि विश्वास यांचं प्रतिनिधित्व करतो…

तसेच या टीममध्ये अनुभवी नेते आणि नव्या पिढीतील बदल घडवणारे तरुण यांचा समावेश असल्याचंही त्यांनी नमूद केलं… पुरुष आणि महिलांचा समतोल असलेली ही मजबूत टीम आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांची चांगली जाण ठेवते, असंही त्यांनी सांगितलं…


राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे केरळमधील राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे… आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button