City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात स्पा सेंटरच्या आड देहव्यापार उघड; पोलिसांची मोठी कारवाई, महिलांची सुटका

नागपूर शहरातील बेलतरोडी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहव्यापार उघडकीस आणला आहे. मनिषनगर येथील “7-C वेलनेस स्पा”वर टाकलेल्या छाप्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मंगळवारी बोगस ग्राहक पाठवून कारवाईचे नियोजन करण्यात आले.

ग्राहकाशी व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी तत्काळ छापा टाकत सुरू असलेला अनैतिक प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणात सोना सौरभ अडिगणे (वय 28, रा. नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात आरोपी महिलांनी बाहेर राज्यातील गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. छाप्यात संभाजीनगर आणि ओडिशा येथील महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षिततेसाठी करूणा वसतीगृहात ठेवण्यात आले आहे.

कारवाईदरम्यान ५ हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4, 5, 7, 8 तसेच बीएनएस कलम 143(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.


स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांवर पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.
नागपूर पोलिसांनी यापुढेही अशा बेकायदेशीर रॅकेट्सवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button