AmravatiLatest NewsSocial News

गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग संशोधन प्रकलपाची राज्यस्तरावर दखल, प्रा. प्रमोद पंडीत यांचा प्रकल्प टॉप 10 मध्ये 

अमरावती (दि. 18.03.2026) – उच्च शिक्षण घेणा-या विद्याथ्र्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी 2008 मध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी ‘आविष्कार’ स्पर्धेची सुरुवात केली. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर आणि पी.पी.जी. (पीएच.डी) या गटांमध्ये जिल्हास्तर, विद्यापीठ स्तर आणि आंतर विद्यापीठ (महाराष्ट्र राज्य) स्तरावर घेण्यात येते. यावर्षी 18 वी आविष्कार स्पर्धा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठद्वारा संचालित मॉडेल डिग्री कॉलेज बुलडाणा येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी पी.पी.जी. (पीएच.डी) गटामध्ये आपला संशोधन प्रकल्प बुलडाणा जिल्हा स्तरावर सादर केला. त्यांच्या गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग या संशोधन प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळून त्यांची विद्यापीठ स्तरासाठी निवड करण्यात आली. दि. 30 व 31 डिसेंबर, 2025 रोजी झालेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे त्यांनी आपला संशोधन प्रकल्प सादर केला व प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला. याबद्दल त्यांना विद्यापीठ स्तरावर अत्यंत मानाच्या समजला जाणारा ‘कलरकोट’ ने सन्मानित करण्यात आले व आंतर विद्यापीठ (राज्य) स्तरावर त्यांची निवड झाली. राज्यस्तरावरील ही स्पर्धा 28 ते 31 जानेवारी, 2026 दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील 26 विद्यापीठांनी सहभाग घेऊन पदवी, पदव्युत्तर आणि पी.पी.जी. (पीएच.डी) गटात संपूर्ण महाराष्ट्रातील 910 संशोधक विद्याथ्र्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले. यामध्ये पी.पी.जी. (पीएच.डी) गटामधून प्रा. प्रमोद विश्वनाथ पंडीत यांच्या संशोधन प्रकल्पाची राज्यस्तरावरील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये निवड करण्यात आली.
               प्रा. प्रमोद विश्वनाथ पंडीत हे मॉडेल डिग्री कॉलेज बुलडाणा येथे कार्यरत आहेत. त्यांचे श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथील संशोधन केंद्रात डॉ. सुनिता कलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विषयांमध्ये संशोधन (पीएच.डी.) सुरू असून त्यांनी चिखली तालुक्यातील भानखेडे येथील महादेव कोळी या जमातीतील आदिवासी महिला करीत असलेल्या बिब्ब्यापासून गोडंबी प्रक्रिया उद्योग डोळ्यासमोर ठेवून पश्चिम विदर्भाच्या संदर्भात संशोधन प्रकल्प राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत सादर केला. या प्रकल्पासाठी त्यांना आचार्य पदवीच्या मार्गदर्शिका डॉ. सुनिता कलाखे, मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसणे आणि भानखेडे येथील पोलीस पाटील मिलींद इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. प्रमोद पंडीत यांच्या गोडंबी प्रक्रिया उद्योग संशोधन प्रकल्पाची महाराष्ट्रातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे डॉ. अण्णासाहेब म्हळसणे यांनी अभिनंदन करुन यशाच्या शुभेच्छा दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button