India NewsLatest NewsSocial News

इंदौरमध्ये भीषण आग; EV चार्जिंग पॉइंट स्फोटानंतर घर जळून खाक, ८ जणांचा मृत्यू

इंदौर शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पॉइंटवर स्फोट झाल्यानंतर लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे.


ही दुर्घटना बुधवारी, १८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास इंदूर येथील तीन मजली घरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, घराबाहेर असलेल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पॉइंटवर अचानक स्फोट झाला.

या स्फोटानंतर उभी असलेल्या कारला आग लागली आणि काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला विळखा घातला. आग इतकी भीषण होती की घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये दोन लहान मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात हानी झाली असून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य हाती घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

दरम्यान, या घटनेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, EV चार्जिंग पॉइंटवरील तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण इंदूर शहर हादरले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणातील चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button