Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

अमरावती शहरात प्रथमच जगत ज्योती Mahatma Basaveshwar महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला… वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लाभली…


Amravati शहरातील हिंदू स्मशानभूमी समोर समस्त वीरशैव लिंगायत समाज, सर्व शाखीय अमरावती जिल्हा यांच्या वतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

या ऐतिहासिक सोहळ्याला Siddha Chaitanya Shivacharya Maharaj, महाधिपती जगद्गुरु श्री पलसिद्ध मठ संस्थान, साखरखेडा (जि. बुलढाणा) तसेच Shivshankar Shivacharya Maharaj, महाधिपती श्री गंगाधर स्वामी दीर्शेफ मठ संस्थान, नेरपिंगळाई (जि. अमरावती) यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार Anantrao Gudhe उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू स्मशानभूमी संस्थान गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि समाजसेवक Bharat Appa Mendse, तसेच महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते Vilas Ingole यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे विधिवत अनावरण करून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यामुळे अमरावती शहरात सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश देण्यात आला असून, बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.


अमरावती शहरात प्रथमच पार पडलेल्या या भव्य सोहळ्यामुळे वीरशैव लिंगायत समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button