AmravatiLatest News

विद्यापीठात ‘विद्यार्थी संवाद व गटचर्चा’ कार्यक्रम संपन्न.. महिला दिनानिमित्त गृहविज्ञान विभागाचा विद्यार्थी केंद्री उपक्रम

अमरावती (दि.16.03.2026) –  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृह विज्ञान विभाग व इंडियन इन्स्टिट¬ुट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थी संवाद व गटचर्चा’ हा एक अनोखा विद्यार्थी केंद्री उपक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी गृह विज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय, प्रमुख अतिथी म्हणून इंडियन इन्स्टिट¬ुट ऑफ मास कम्युनिकेशन येथील प्राध्यापक डॉ. विनोद निताळे, डॉ. आदित्य मिश्रा, डॉ. प्रमोद गायकवाड, जयंत सोनवणे, डॉ. संयोगिता देशमुख उपस्थित होते.
                प्रमुख अतिथी डॉ. विनोद निताळे यांनी महिला व त्यांचे विविध विषयासंदर्भात त्यांच्या विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या दृकश्राव्य चित्रफितीमागील प्रक्रिया सांगून उदाहरणांद्वारे माहिती दिली. यावेळी चित्रफितींचे सादरीकरण देखील करण्यात आले. विद्याथ्र्यांनी विविध अॅपचा वापर चित्रण, संवाद, आवाज, संपादन यासाठी करून अतिशय परिणामकारक चित्रफिती सादर करुन चित्रफितींचा विषय व त्या मागची भूमिका यावर चर्चा केली. महिलांचे विश्व, त्यांची क्षमता व उपलब्धी, इतिहासातील व आजच्या काळातील कणखर महिला, महिलांवरचे अत्याचार, महिला खेळाडू, लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर, कुष्ठरोगी महिलांचे परिस्थितीजन्य चित्रण चित्रफितीच्या माध्यमातून विद्याथ्र्यांनी सादर केले.
                 डॉ. आदित्य मिश्रा यांनी उपक्रमाचे कौतूक करीत अशा कार्यक्रमांद्वारे संस्थात्मक आणि विद्यार्थी सुसंवाद, विचारांची देवाणघेवाण आणि विविध विषयाचे पैलू विद्याथ्र्यांना जाणून घेता येतात असे सांगितले. डॉ. प्रमोद गायकवाड यांनी स्त्रीशक्ती यावर कविता सादर केली. एक नारी, सब पे भारी या ओळीचा उलगडा करून सांगितला. त्यासोबतच डॉ. गायकवाड यांनी चित्रफित निर्मितीमागील रूपरेषा समजावून सांगितली. श्री जयंत सोनवणे यांनी चित्रफिती तयार करण्यासाठी आवश्यक व नवनवीन उपलब्ध तंत्रज्ञान विद्याथ्र्यांनी कसे आत्मसात करावे, यावर मार्गदर्शन करतांना समाजमाध्यमांवर प्रभावी जाहिरात करण्यासाठी रोजगार देणारे हे नवीन क्षेत्र असल्यामुळे प्रतिभा आणि कल्पकतेचा मेळ घालून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रफित निर्मिती क्षेत्रात विद्याथ्र्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
                  अध्यक्षीय भाषणात विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांनी महिलाविषयक प्रश्नांची जाणीवजागृती केवळ महिला दिनानिमित्त सीमित न राहता लिंग समभाव ठेवून सातत्याने विचार मंचावरून आणि माध्यमांचा अतिशय प्रभावीपणे वापर करून सुधारणावादी धोरणांचा जागर करत रहावा, असे आवाहन विद्याथ्र्यांना केले. विभागाचे व इंडियन इन्स्टिट¬ुट ऑफ मास कम्युनिकेशनच्या विद्याथ्र्यांचे चर्चासत्र झाले. यामध्ये विद्याथ्र्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार अनुश्री आडे हिने केले. कार्यक्रमाकरिता विभागातील सुमित गेडाम, दिपाली भैसे, शिल्पा इंगोले, सुमेध वडुरकर, आयतल कामदार, क्षितिजा वानखडे, भक्ती सोंधिया, श्री अशोक हिरे, श्री वसंत इंगळे, श्री चरणदास जामठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला शिक्षक तसेच दोन्ही संस्थांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button